ज्या अती-भीषण नैसर्गिक परिस्थितीत कारगिलमध्ये भारतीय शूर जवान लढले...प्रसंगी शहीद पण झाले आणि अंतत: जिंकले त्या विलक्षण खडतर अश्या प्रदेशाची आज आपण माहिती करून घेऊया...
अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असा पराकोटीचा नीच पाकिस्तानी सैनिक डोंगरावर भक्कम अश्या बंकर्स मध्ये २-३ महिने पुरेल एवढी शिदोरी घेऊन बसलेला...आणि भारतीय सैनिक मात्र पायथ्याशी...ना लपायला आडोसा...ना इंचभरही पुढे सरकण्यासाठी योग्य अशी जमीन....रात्री हाडे जगाच्या जागी थीजवणारी भयंकर थंडी आणि दिवसाच्या उजेडात जरा म्हणून पुढे सरकायचा प्रयत्न केला तर वरून सर्र्र्कन खाली येणाऱ्या अत्याधीनिक गोळ्यांच्या फेरीच्या फैरी...
"एकदा सावकाश पुढे सरकताना पाकड्यांनी गोळीबार सुरु केला...आणि एक गोळी कानाशेजारून सटकन सुं करत निघून गेली तेव्हा आई वडलांचे, बायको मुलांचे चेहरे क्षणार्धात डोळ्यासमोर तरळून गेले." हे नंतर एका भीषण हातघाईच्या लढाईत कारगिल मध्ये शहीद झालेल्या दिल्लीच्या मेजर अनुज नय्यर या शहीद वीराचे बोल परिस्थितीची भीषणता समजवायला पुरेसे आहेत.

हा प्रदेश किती दुर्गम आहे आणि इथे लढणे तर दूर राहिले जगणे सुद्धा किती मुश्कील आहे हे जेव्हा आपल्या लक्ष्यात येईल तेव्हा कारगिल चे युध्द म्हणजे किती महाभयानक संग्राम होता हे आपल्या लक्ष्यात येईल आणि तेव्हाच आपण आपल्या सैनिकांना 'युद्ध सुरु नसताना देखील'...आदर सन्मान द्यावयास सुरुवात करू...कदाचीत